Prathamesh Thakur, a boy from Bhusawal won the gold medal in running भुसावळातील प्रथमेश ठाकूर या बालकाने रनिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक
Prathamesh Thakur, a boy from Bhusawal won the gold medal in running भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलचा तिसरीचा विद्यार्थी प्रथमेशसिंग समशेरसिंग (बबलू) ठाकूर या आठ वर्षीय चिमुकल्याने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इके नेपाळ अॅटेलेटीक्स मैदानी 2022 या स्पर्धेत 100 मीटर रनिंग अवघ्या 15.36 मिनिटात पार करीत सुवर्ण पदक पटकावले. विशेष म्हणजे नाशिक विभागातून प्रथमेश हा एकमेव खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाला. 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या स्पर्धेत त्याची रनिंगसाठी 2 ऑगस्ट रोजी निवड झाली. त्याला ममता जागिंड यांचे मार्गदर्शन लागले.
भुसावळात प्रथमेशचे जंगी स्वागत
रविवार, 7 रोजी सकाळी प्रथमेश त्याचे वडील समशेरसिंग उर्फ बबूल ठाकूर यांच्या सोबत भुसावळ जंक्शनवर आल्यावर त्याचे स्वागत करण्यासाठी रेल्वे स्थानकावर ठाकूर यांच्या हितचिंतकांनी गर्दी केली होती. इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीयस्तरावर सुवर्ण पदक मिळविल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



