जागतिक आदिवासी दिनानिमित्त निमंत्रितांचे भव्य काव्य संमेलन


चाळीसगाव : जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीदिनी काव्य संमेलनाचे आयोजन आदिवासी साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य चाळीसगावतर्फे शहरातील आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध आदिवासी साहित्यीक एल.टी.सोनवणे होते.

यांची प्रमुख उपस्थिती
उद्घाटक म्हणून आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलचे मुख्याध्यापक के.एन.तडवी होते. यावेळी उद्घाटनपर भाषणात त्यांनी आदिवासींचे भारतीय इतिहासातील योगदान सांगून उदाहरण दाखले दिलेत. प्रमुख अतिथी प्रा.डॉ.साधना निकम होत्या,
यावेळी आदिवासी पद्धतीने पूजन होऊन उद्घाटन करण्यात आले. अनेक दर्जेदार कवींनी रचना सादर केल्या. त्यात कवी गौतमकुमार निकम, कवयित्री वंदना मोरे, कवी राकेश खैरनार, प्रा.श्यामकांत निकम, कवी एल.टी.सोनवणे, बालकवी तन्मय गायकवाड, कवी दिनेश चव्हाण, कवी सुनील गायकवाड यांनी दर्जेदार रचना सादर केल्या. कार्यक्रमात कलाशिक्षक चेतन कुर्‍हाडे, समाधान बच्छाव, लॅब असिस्टंट प्रदीप ठाकूर, सुनील जानराव, रुपलाल ओलिक्षेत्री आदी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी साहित्य अकादमीतर्फे सुनील गायकवाड व चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन कवी सुनील गायकवाड तर आभार कवी गौतमकुमार निकम यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !