क्रांतीकारकांसह थोर समाज सुधारकांच्या साकारल्या वेषभूषा
भुसावळात भाजपातर्फे आयोजित स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद
भुसावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे ‘हर घर तिरंगा घरघर तिरंगा’ अभियानांतर्गत क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारक व थोर समाज सुधारक यांच्यावर आधारीत भव्य वेशभूषा स्पर्धा मंगळवारी शहरातील प्रभाकर हॉलमध्ये झाली. विविध वयोगटातील विजेत्यांना आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
थोर पुरूषांच्या साकारल्या भूमिका
स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या 431 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी भगतसिंग, वीर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजगुरू, झाशीची राणी, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, चंद्रशेखर आझाद अशा क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर व थोर समाजसेवकांच्या वेशभूषा करून त्यांच्या व्यक्तिमत्वावर सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या जडण-घडणीत मोलाचा सहभाग असणार्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.



व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, राजेंद्र नाटकर, मनोज बियाणी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, अजय नागराणी, सतीश सपकाळे, चंद्रशेखर इंगळे, शैलेजा पाटील, अनिता आंबेकर, दीपाली बर्हाटे, भारती वैष्णव, प्रशांत देवकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन व जीवन महाजन यांनी तर आभार शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी किरण मिस्त्री, कैलास झोपे, प्रा.विलास अवचार, संजय बोचरे, श्रेयस इंगळे, अनिरुद्ध कुलकर्णी, भावेश चौधरी, प्रशांत भट, विजय डोंगरे सागर जाधव आदींनी परीश्रम घेतले.

