पावणेतीन वर्षानंतर मुक्ताईनगरात भाजपाला मिळाले कार्यालय

प्रवर्तन चौकात कार्यालय : कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसह सर्वसामान्यांची झाली सोय


After Fifty Three Years BJP Got Office In Muktainagar मुक्ताईनगर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 21 डिसेंबर 2019 रोजी भाजपाला सोडचिठ्ठी देत 23 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तत्पूर्वी 19 डिसेंबर 2019 रोजी रात्री शहरातील भाजपा तालुका कार्यालयावरील भाजपाचा फलक काढण्यात आला होता तेव्हापासून शहरांमध्ये तालुका भाजपाचे कार्यालय नसल्याने कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांची गैरसोय होत होती. आता तब्बल 963 दिवसांनी अर्थात पावणे तीन वर्षानंतर मुक्ताईनगर तालुका भाजपा कार्यालय शहरातील प्रवर्तन चौकामध्ये सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

खडसेंनी प्रवेश करताच भाजपा कार्यालयाला कुलूप
डिसेंबर 2019 मध्ये माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या वाटेवर अशा चर्चा सुरू असताना 19 डिसेंबर 2019 रोजी मुक्ताईनगर शहरातील भाजपा कार्यालयावर लावण्यात आलेले भाजपा कार्यालय, मुक्ताईनगर असा नामफलक काढण्यात आला मात्र त्यानंतर पक्ष कार्यालय सुरू झालेच नाही तर दुसरीकडे 21 ऑक्टोबर 2019 रोजी माजी मंत्री खडसेंनी भाजपाचा त्याग करीत हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले व त्याच रात्री भाजपा कार्यालयावरील भाजपाचे फलक हटवण्यात आला.

पावणेतीन वर्षांनी सुरू झाले कार्यालय
मंगळवार, 9 ऑगस्टपासून शहरातील प्रवर्तन चौकातील प्रांजली झेरॉक्स जवळ मुक्ताईनगर तालुका भाजपाचे कार्यालय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांच्या सेवेसाठी संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष प्रफुल जवरे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !