भुसावळात प्रभाग 25 मध्ये डॉ.छाया देशमुख यांच्यातर्फे राष्ट्रध्वजाचे 12 रोजी वितरण
भुसावळ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शहरातील प्रभाग क्रमांक 25 मधील रहिवाशांना सामाजिक कार्यकर्ते रुपेश देशमुख तसेच डॉ.छाया रुपेश देशमुख( फालक) यांच्या कडून संपूर्ण प्रभागातील नागरीकांना शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 रोजी पवित्र तिरंगा ध्वजाचे घरपोच नि:शुल्क वाटप केले जाणार आहे. ज्यांना पवित्र तिरंगा ध्वज घरी उभारायचा आहे, रुपेश देशमुख यांच्याशी संपर्क साधावा (9421680840) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

