भुसावळातील लोणारी परीवारातर्फे प्रभाग नऊमध्ये नागरीकांना राष्ट्रध्वजाचे वितरण


भुसावळ : संपूर्ण देशात व राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 व्या वर्षानिमित्त केंद्र शासनातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. देशातील प्रत्येक घरावर नागरिकांतर्फे तिरंगा फडकविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने भुसावळ्यातील माजी प्रभारी नगराध्यक्ष व प्रभाग 9 चे माजी नगरसेवक युवराज दगडू लोणारी व त्यांच्या परीवारातर्फे प्रभागातील नागरीकांना घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.

प्रभाग नऊमध्ये घरोघरी फडकणार तिरंगा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने भुसावळ्यातील प्रभाग नऊमध्ये देखील घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी माजी नगरसेवक युवराज लोणारी, माजी नगरसेविका मीना युवराज लोणारी व लोणारी परीवारातील सदस्यांच्या उपस्थितीत प्रभागातील नागरीकांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !