यावल शहरातील प्रौढाची आत्महत्या
यावल : शहरातील संत रोहिदास नगरात एका ५५ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. हा प्रकार शेजारील रहिवाशाच्या निर्दशनास आला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत घरात एकटे राहत होते.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शहरात संत रोहिदास नगरात पंडीत सुकदेव डोळे (५५) हे इसम एकटे राहत होते. त्यांचा मुलगा पुणे येथे कामाला गेल्याने ते घरी एकटे होते दरम्यान रात्री त्यांनी राहत्या घरात ठिबक नळीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली हा प्रकार शेजारील रहिवासींच्या निर्दशनास येताच त्यांना ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले येथे डॉ.सचिन देशमुख यांनी त्यांना मृत घोषीत केले या बाबत यावल पोलिसात मधुकर डोळे यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हवालदार बालक बाऱ्हे करीत आहे मयत यांच्या पश्चात मुलगा, भाऊ असा परिवार आहे त्यांनी आत्महत्या का केली कळु शकले नाही.

