यावल शहरात आज पेहरन ए-शरीफ उत्सव रंगणार

यंदाच्या उत्सवाचे आयोजन बाबूजी पुरा उत्सव समितीकडून


यावल : शहरात शनिवार, 13 रोजी ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाला सुमारे शंभर वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार मोहरमच्या 14 तारखेला हा उत्सव साजरा होतो. त्यात सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन म्हणजेच तब्बरूकचे (पवित्र वस्त्र) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक हजेरी लावतात. यंदाच्या उत्सवाचे आयोजन बाबूजी पुरा उत्सव समितीने केले आहे.

पवित्र वस्त्राची मिरवणूक
शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक ( पवित्र वस्त्र ) असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून यावल येथे या पवित्र वस्त्राची सजवलेल्या डोलीतून वाद्याच्या गजरात धार्मिक गीत (नाते पाक) गात मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या उत्सवात हिंदू-मुस्लिम बांधवही सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणुकीत नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची धारणा आहे. जिल्ह्यासह मंबई, मालेगाव, बर्‍हाणपूर, सूरत, खंडवा येथील भाविक येतात.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
उत्सव समिती अध्यक्ष बासीत खान असलम खान .
उपाध्यक्ष शेख मोहसीन शेख नय्यर, उपाध्यक्ष नदीम खान साबीर खान, कार्याध्यक्ष कासीम खान नासीर खान, खजिनदार रमीज शेख बशीर,
सचिव शारुख खान इब्राहिम खान, शाहिद खान शरीफ खान, युनूस बिस्मिल्ला पिंजारी, कासीम खान अकरम खान, अतीक खान खालीद खान, शोएब खान ईब्राहिम खान, मीनाज शेख ईकबाल, शेख तन्वीर शेख निजान आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !