तिरंगा एक्स्प्रेस म्हणून धावली भुसावळ-ईगतपुरी मेमू
Bhusawal-Eagatpuri MEMU ran as Tricolor Express भुसावळ : भुसावळ-ईगतपुरी मेमु गाडी शनिवारी तिरंगा एक्स्प्रेस धावली. या गाडीतील सर्वच प्रवाशांना शासनातर्फे तिरंगा ध्वज देण्यात आला. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, एडीआरएम रूखमैय्या मिना, प्रांताधिकारी रामसिंग सूलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी भुसावळ-ईगतपुरी मेमू गाडीला तिरंगा एक्स्प्रेस म्हणून चालविली जाणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांनीदेखील जळगाव-शिरसोली दरम्यान प्रवास केला. यावेळी त्यांच्या समवेत चाळीसगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार आदींची उपस्थिती होती.
आनंदोत्सव प्रत्येकाने साजरा करावा
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत असल्याने देशाबद्दल प्रत्येकाला अभिमान असावा, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या तर आमदार संजय सावकारे यांनी अमृत महोत्सव हा जणू आनंदोत्सवच म्हणून प्रत्येकाने साजरा करावा, असे आवाहन केले.

प्रत्येक प्रवाशाला तिरंगा ध्वजाचे वाटप
शनिवारी सकाळी ईगतपुरी मेमू गाडीत शासनातर्फे 500 तिरंगा झेंडे प्रवाशांना देण्यात आले. गाडीतील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळी सात वाजता सुटणारी ही गाडी शनिवारी दहा मिनिटे शीराने सुटली. यावेळी खासदार, आमदार, रेल्वेचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी गाडीला हिरवा झेडा दाखवून गाडी रवाना झाली.प्रत्येक स्थानकावर स्वागत
भुसावळ – ईगतपुरी मेमू गाडी भुसावळ येथून सुटल्यावर जळगाव, पाचोरा, चाळीसगाव या स्थानकांवर या गाडीचे तेथील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले.
