डांभूर्णीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण : अज्ञाताविरोधात गुन्हा


Kidnapping of minor girl in Dambhurni: Crime against unknown यावल : तालुक्यातील डांभूर्णी येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञाताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल पोलिसात गुन्हा दाखल
डांभूर्णी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्याने यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !