भुसावळात कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांच्यातर्फे राष्ट्रध्वजाचे वाटप
भुसावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गेल्या दहा वर्षांपासून शिव मंडल, शिव प्रतिष्ठान शिवसेना शाखा लक्ष्मी चौक मित्र परीवारातर्फे कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी आठ वाजता भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आले. प्रसंगी उपस्थितांना बुंदी लाडू वाटप करण्यात आले. यावेळी येणार्या-जाणार्या भुसावळकरांना तसेच बालकांना पेन, ध्वज, स्टिकर, चॉकलेट, खेळणी वाटप करण्यात आली.
तिरंगा रॅलीने वेधले लक्ष
सकाळी 11 वाजता वाजता शिव मंडळाच्या सर्व सदस्यांसह सोनल शर्मा, मेघा वैष्णव, राज भराडिया, जे.बी.कोटेचा, नितीन शर्मा आदींच्या उपस्थितीत राम मंदिर ते बालाजी मंदिर, गांधी चौक, भजेगली, सराफ बाजार, लक्ष्मी चौकापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. प्रसंगी भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अश्या घोषणाही देण्यात आल्या. माजी नगरसेवक दिनेश राठी, देवा वाणी, मुकेश गुंजाळ, उमाकांत शर्मा (नमा), रामवल्लभ झंवर, महेंद्र जैन, गोपाल चांडक, कैलास अग्रवाल, सुनील अग्रवाल, महेश झंवर, पूजन महाजन, आदित्य शर्मा, संजय ठाकुर, अजय चौरसीया, शुभम चौरसीया, निखील नगरे, श्याम अग्रवाल, पीयूष शर्मा आदी उपस्थित होते.

