भुसावळ परीसरात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन जल्लोषात

स्वातंत्र्य दिन उत्साहात : शाळा-महाविद्यालयांसह संस्था, संघटनांतर्फे ठिकठिकाणी ध्वजारोहण ; शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन


भुसावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भुसावळ शहर व विभागातील विविध शासकिय कार्यालय, विविध शाळा, संघटना, संस्थांतर्फे ध्वजारोहण मोठ्या थाटात करण्यात आले. यंदाचेे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असल्याने नागरीकांनी घरोघरी 13 ते 15 दरम्यान तिरंगा ध्वज फडकवला. वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आदी सामाजिक उपक्रमही स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राबवण्यात आले.

भुसावळात तिरंगा रॅलीने वेधले लक्ष
भुसावळ : शहरात मुख्य ध्वजारोहण प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर आमदार संजय सावकारे यांचे हस्ते तिरंगा सन्मान रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रांताधिकार्‍यांसह डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धीवरे यांची उपस्थिती होती. भर पावसात हजारो नागरीक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी या रॅलीत सहभागी झाल्या.

भुसावळात कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांच्यातर्फे राष्ट्रध्वजाचे वाटप
भुसावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गेल्या दहा वर्षांपासून शिव मंडल, शिव प्रतिष्ठान शिवसेना शाखा लक्ष्मी चौक मित्र परीवारातर्फे कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी आठ वाजता भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आले. प्रसंगी उपस्थितांना बुंदी लाडू वाटप करण्यात आले. यावेळी येणार्‍या-जाणार्‍या भुसावळकरांना तसेच बालकांना पेन, ध्वज, स्टिकर, चॉकलेट, खेळणी वाटप करण्यात आली.

तिरंगा रॅलीने वेधले लक्ष
सकाळी 11 वाजता वाजता शिव मंडळाच्या सर्व सदस्यांसह सोनल शर्मा, मेघा वैष्णव, राज भराडिया, जे.बी.कोटेचा, नितीन शर्मा आदींच्या उपस्थितीत राम मंदिर ते बालाजी मंदिर, गांधी चौक, भजेगली, सराफ बाजार, लक्ष्मी चौकापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. प्रसंगी भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अश्या घोषणाही देण्यात आल्या. माजी नगरसेवक दिनेश राठी, देवा वाणी, मुकेश गुंजाळ, उमाकांत शर्मा (नमा), रामवल्लभ झंवर, महेंद्र जैन, गोपाल चांडक, कैलास अग्रवाल, सुनील अग्रवाल, महेश झंवर, पूजन महाजन, आदित्य शर्मा, संजय ठाकुर, अजय चौरसीया, शुभम चौरसीया, निखील नगरे, श्याम अग्रवाल, पीयूष शर्मा आदी उपस्थित होते.

खडसे टॅलेंट स्कूल, मुक्ताईनगर
मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक उपस्थित होते. प्राचार्य अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

बोदवड शहरात चित्रकला स्पर्धा
बोदवड : शहरात जागृत मरीमाता देवस्थानच्या वतीने (जेएमडी ट्रस्ट) जळगाव, मुंबई व आर.एस.आर्ट स्टुडिओ आर्ट गॅलरी, मुंबईतर्फे जेएमडी ट्रस्टचे संस्थापक देविदास राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धेचे हरीरकांता फार्मसला आयोजन करण्यात आले. मुंबईतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार आणि एनएसएसीबीच्या महिला विभागाच्या अध्यक्षा आर्टिस्ट स्वाती राखोंडे यांनी स्पर्धेचे आयोजन केले. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे 15 मिनिटांत चारकोल पोट्रेट बनवून सर्वांना मंत्रमुग्ध केले व पोर्ट्रेट पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना भेट केले. या स्पर्धेत 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. न.ह.राका हायस्कूलचे प्राचार्य पी.एम.पाटील, डॉ.सुधीर पाटील, संस्थेचे संस्थापक देविदास राखोंडे, नगरसेवक दिनेश माळी, संस्थाध्यक्ष निवृत्ती राखोंडे, उपाध्यक्ष संतोष तेली यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रमाणपत्र, राष्ट्रध्वज, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन यशोदास राखोंडे यांनी केले. पूजा गणेश माळी यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. धनराज राखोंडे, रवी मराठे, जीवन माळी, रेखा राखोंडे, गजानन नेरकर, पिंटू कार्ले, राहुल घाटे, गणेश माळी यांचे सहकार्य लाभले.

श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर
भुसावळ : हिंदी सेवा मंडळ भुसावळद्वारा संचलित श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारत माता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, साने गुरुजी, भगतसिंग चंद्रशेखर आझाद, मदर तेरेसा यांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष रवीकांत परदेसी, महामंत्री मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष महेश दत्तजी तिवारी, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडाले, सहमंत्री बिशनजी अग्रवाल यांच्याहस्ते विविध विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी इंग्रजी माध्यम इयत्ता तिसरीचा विद्यार्थी सार्थक गुणाल याने अप्रतिम इंग्रजीत भाषण केले. विद्यालयातील इंग्रजी माध्यम प्रमुख रीता सत्येंद्र शर्मा यांनी मार्गदर्शन केले.

सावद्यात स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा
सावदा : सावदा येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव अत्यंत उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी नागरीक, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी आ.ग.हायस्कूल व ना.वि.ह.पाटील कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी आझादी तसेच तिरंग्या विषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. संभाजी चौकात भारत मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ.व्ही.जे.वारके यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यधिकारी किशोर चव्हाण, माजी नगराध्यक्षा अनिता येवले, हेमांगी चौधरी, ताराबाई वानखेडे, राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक अजय भारंबे, शाम अकोले, सिद्धार्थ बडगे, माजी नगरसेविका सुभद्राबाई बडगे, लीना चौधरी, रंजना भारंबे, जयश्री नेहेते, मीनाक्षी कोल्हे, रेखा वानखेडे, नंदाबाई लोखंडे, करुणा पाटील, नीलिमा बेंडाळे, नेहा गाजरे यांच्यासह पदाधिकारी, व नागरीक उपस्थित होते. सावदा पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते. सावद्यातील आ.ग.हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे यांनी ध्वजारोहण केले. इंदिरा गांधी चौकात देखील भारत मातेचे पूजन करण्यात आले. प्राथमिक विद्या मंदिरात देखील ध्वजारोहण करण्यात आले.

कुर्‍हा परीसरात ध्वजारोहण उत्साहात
कुर्‍हाकाकोडा : कुर्‍हा येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. गोळवलकर गुरूजी सार्व संस्स्था कुर्‍हा येथे संस्थेचे कोषाध्यक्ष पुरणमल चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिवाजी हायस्कूल कुर्‍हा येथे संस्थेचे संचालक अशोक कांडेलकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वढोदा वनपरीक्षेत्र कार्यालय, कुर्‍हा येथे वनपरीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांचाहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कुर्‍हा पोलीस दुरक्षेत्र येथे हवालदार श्रावण जवरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कुर्‍हा ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण सरपंच सुनीता मानकर यांच्याहस्ते करण्यात आले.सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

भुसावळात आरोग्य शिबिर
भुसावळ : स्वा.सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था व गायत्री शक्तिपीठ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री रिदयम हॉस्पिटल व नेत्रम हॉस्पिटलच्या सहयोगाने ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत भव्य आरोग्य तपासणी तसेच मोतिबिंदू व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. गायत्री शक्तिपीठात सकाळी 10 ते 12.30 वाजेदरम्यान हे शिबिर झाले. शिबिरात 65 ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह (डायबेटीज), विविध आजारांचे मोफत निदान व आवश्यकतेनुसार ईसीजी करण्यात आले तसेच डोळ्यांची तपासणीदेखील करण्यात आली. या शिबिरास भुसावळ शहरातील श्री रिदयम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स व नेत्रम हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी महेश फालक, गणेश वढवेकर, किरण फालक आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जे.एन.पुराणिक, अंजली कवठाळकर, निरज तिवारी, संजय बोचरे, महेंद्र गोडबोले, सतीश भावे, रागिणी जनार्दन पुराणिक, राजेश कोष्टी, कल्पना महेश फालक व गौरी पंडितराव, दिनेश जोशी, महेंद्र गिरनारे व प्रज्ञा पेटारे यांनी परीश्रम घेतले.

गाडगेबाबा हिंदी कॉलेजमध्ये ध्वजारोहण
भुसावळ : स्वातंतत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाच्या प्रांगणात अ‍ॅड.महेशदत्त तिवारी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रांगोळी, घोषवाक्य, निबंध स्पर्धा, गीत गायन स्पर्धा झाल्या. हिंदी सेवा मंडळाचे पदाधिकारी मधुलता शर्मा, सत्यनारायण गोडीयाले, अध्यक्ष डॉ.रवीकांत परदेशी, बिशन अग्रवाल, प्राचार्य डॉ.रमेश जोशी आदी उपस्थित होते.

ताप्ती पब्लिक स्कूल,
भुसावळ : ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्याहस्ते तिरंगा फडकवण्यात आला. ध्वजवंदनप्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष शिरीषकुमार नाहाटा यांच्यासह ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सर्व सभासद तसेच ताप्ती शाळेच्या मुख्याध्यापिका निना कटलर, पु.ओ. नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी वायकोळे यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी रॅली काढण्यात आली. मुख्याध्यापिका निना कटलर
यांच्यासह शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.

रॅलीचे भुसावळात स्वागत
भुसावळ : शहरात भुसावळ पोलीस विभाग व होमगार्ड विभागातर्फे 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भुसावळ शहरातून 75 मीटर लांबीच्या तिरंगा झेंड्याची रॅली काढण्यात आली. या रॅलीला महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरुवात होऊन समारोप ताप्ती पब्लिक स्कूलजवळ झाला. प्रसंगी रॅलीचे स्वागत ताप्ती शाळेच्या मुख्याध्यापिका निना कटलर यांनी केले. रॅलीच्या समारोपप्रसंगी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे उपस्थित होते.

बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ
भुसावळ : बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये संस्थाध्यक्ष मनोज बियाणी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, उपाध्यक्ष विनोद बियाणी, संचालिका स्मिता बियाणी, संचालक रोनक बियाणी तसेच राजू पारीख, प्रवीण भराडीया, गोपाळ ठाकूर आदींसह शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, बियाणी बी.एड.कॉलेजच्या प्राचार्या कांचन जोशी, शाळेचे पर्यवेक्षक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !