भुसावळात स्वातंत्र्यदिनी घडले सांस्कृतिक परंपरेचे दर्शन
भुसावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या सदस्यांनी सहभागी होऊन विविधतेत एकतेचे प्रदर्शने घडवले. प्रादेशिक संस्कृतीचे दर्शन घडविताना कश्मिरी गाण्यावर नृत्य केले तसेच भुसावळ शहरातील सिल्व्हर लाईन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या 75 मिनिटाच्या नॉनस्टॉप रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना क्लबतर्फे एनर्जी ड्रिंक देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. त्यांनी संस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी विविध वेशभूषा धारण करून स्केटिंग केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटी अध्यक्षा प्रतीक्षा अनिकेत पाटील, सीमा सोनार, हेमलता सोनार, सुनीता पाचपांडे, मोना भंगाळे, रेवती मांडे, अनिता महाजन व आदिती भडंग आदींची उपस्थिती होती.

