राष्ट्रगीत सुरू होताच भुसावळकर थांबले


भुसावळ : महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामुहिक राष्ट्रगीताच्या आवाहनानंतर सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यदिनी सकाळी अकरा वाजता येथील जामनेर रोड, साक्षी ऑटो पार्कच्या समोर आनंद नगर रीक्षा स्टॉपजवळ राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच वाहतूक थांबली तर नागरीकांनीदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिशिर जावळे, अजय नागराणी, चंद्रशेखर पाटील, अजय माखीजा, अ‍ॅड.कैलास लोखंडे, मयूर सावकारे, रीते चिप्पड, आर.के.कोळी, भिका बाणाईत, गजू सोनार, शांताराम बर्‍हाटे, विनोद आंबेकर, मोहन कासार, कपिल पहुरकर, किरण झांबरे, विशाल बोरोले, बंडू चौधरी, तोवर कुणाल कोलते, योगेश थेरोकर, सुनील तळेले, गिरीश नाले, व इतर नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !