भुसावळ शहरात महिलांच्या एकता रॅलीने वेधले लक्ष
भुसावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील विविध महिला संघटनांच्या महिलांनी एक येत एकता रॅल्ी काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले. रॅलीमध्ये जैन महिला मंडळाच्या सारीका विकास जैन व अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमा बेहरा, सचिव नीलम जैन यांनी सर्व महिलांना एकत्र केले. या रॅलीला प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी पाठिंबा दिला. पिंकेथॉनच्या संस्थापक माधुरी गुजर यांच्यासह इनव्हील ब्लॉसम, जेसीआय क्लब, भुसावळच्या पतंजली ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
तिरंगा एकता रॅलीने वेधले लक्ष
ऐतिहासिक रॅलीतील सहभागी महिला आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला. रॅलीला अष्टभुजा मंदिरापासून सुरुवात झाल्यानंतर बाजारपेठ पोलिस स्टेशन, गांधी पुतळा, सरदार वल्लभभाई पुतळा, मामाजी टॉकीज, जामनेर रोडमार्गे व्यंकटेश मंदिर, नाहाटा कॉलेजजवळ रॅली आल्यानंतर समारोप झाला. रॅलीत देशभक्तीपर गीतांसाठी मनीष मॉलचे दिलीपकुमार रमेशलाल जमनानी यांनी सहकार्य केले. या रॅलीत रजनी सावकारे, प्रा.माधुरी गुर्जर, सारीका जैन, हेमा बेहेरा, नीलम जैन, ऋतिका हेडा, ज्योती दरगड,निशा मंडलेचा, उषा जैन, हर्षा जैन, वीणा जैन, कामिनी जैन, कल्पना मंडोरे, अनिता आंबेकर, शोभा रांजणे, वैशाली सैत, सैतवाल, निकिता खुशलानी, सजन टाक, दीपा पटेल यांच्यासह महिला सहभागी झाल्या.

