मुक्ताईनगर मसंघातील विविध विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर


50 crores sanctioned for various development works in Muktainagar Constituency मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभाग अंतर्गत, सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाठपुराव्याला आले यश
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन मतदार संघातील विविध विकास कामांना पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळून निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत 28 कोटी रुपये, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभाग अंतर्गत 14 कोटी रुपये, सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी आठ कोटी रुपये असा एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !