Cleancheat given to Ajit Pawar is still pending अजित पवारांना दिलेली क्लिनचीट अद्याप प्रलंबित
Cleancheat given to Ajit Pawar is still pending मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता लवकरच कारागृहात जाणार असल्याचा सूचक इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांच्याकडून देण्यात आला होता. त्यांचा रोख अजित पवारांकडे होता. त्यातच आता अजित पवारांना मिळालेल्या क्लिनचीटबाबत मोठे वृत्त समोर आले आहे.
क्लीनचीटला खंडपीठाने स्वीकारलेले नाही
अजित पवारांना देण्यात आलेली क्लिनचीट अद्याप प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांना एसीबीने सिंचन घोटाळा प्रकरणी 2019 मध्ये क्लिनचीट दिली होती. तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी ही क्लिनचीट दिली होती. क्लिनचीट दिल्यानंतर नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात अजित पवार यांना व्हीआयडीसी प्रकरणात क्लिनचीट देऊन त्यात त्यांचा रोल नाही, असे म्हटले होते. मात्र, या क्लिनचीटला नागपूर खंडपीठाने स्वीकरलेले नाही. त्यामुळे अद्याप अजित पवार यांची क्लिनचीट न्यायालयात
प्रलंबित आहे.

