CID will investigate the accidental death of Vinayak Mete ; Chief Minister Shinde’s order विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची होणार सीआयडी चौकशी ; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
CID will investigate the accidental death of Vinayak Mete; Chief Minister Shinde’s order मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
विनायक मेटे यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी त्यांचा मृत्यू अपघात की घातपात असा संशयवजा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळतंय.
मेटे यांच्या पत्नीला आमदारकीची संधी मिळण्याची मागणी
दरम्यान, मेटे यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधान परीषदेवर राज्यपाल कोट्यातून संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीला आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.विनायक मेटे यांच्या कारला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर नुकताच भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचे निधन झाले. तीन दिवसांपूर्वी रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पतीच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मेटे यांनी मराठा आरक्षासाठी मोठा लढा उभा केला होता.

