Power struggle in Maharashtra : Hearing postponed again! महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुनावणी पुन्हा लांबणीवर !
Power Struggle In Maharashtra : Hearing Postponed Again ! मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नेमका काय निकाल येणार? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना पुन्हा सोमवारी सुनावणी लांबणीवर पडला असून मंगळवारी त्याबाबत सुनावणी होईल. याबाबत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे.
एक दिवसाने उशिरा होणार सुनावणी
त्रीसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज ऐवजी सुनावणी मंगळवार, 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. शिवसेना कोणाची आणि शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरणार का? याच्या निकालासाठी आणखी एका दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल.

सेनेत झाले सर्वात मोठे बंड
शिवसेनेच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या रुपात पाहिलंय. त्यानंतर विस्कळीत झालेली शिवसेनेची घडी बसवण्याचं आव्हानही उद्धव ठाकरेंसमोत आहे. शिवाय धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार, यावरुनही चढाओढ पाहायला मिळतेय. त्यासाठीही कागदोपत्री लढा सुरु असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. या सगळ्या अनुशंगाने करण्यात आलेल्या एकूण पाच याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात एका विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
