शिवसेनेवर नेमकी मालकी कुणाची ? : उच्च न्यायालयाने दिले हे निर्देश


नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची निर्मिती करून याकडे हे प्रकरण सुपुर्द करण्याचे निर्देेश न्यायालयाने दिले आहेत. शिवसेनेवर नेमकी मालकी कुणाची? यावरून सुप्रीम कोर्टात न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी शिवसेनेवर हक्क सांगितला असून या संदर्भात एकमेकांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल ₹ आहेत. कोर्टाने यावर एकत्रीत सुनावणी घेण्याचे निश्‍चीत केले असून या अनुषंगाने सुनावणी होत आहे. यावर आधी ४ ऑगस्टला सुनावणी झाली. यानंतर ७ रोजी यावर कामकाज होऊन नंतर १२ ऑगस्ट रोजी याला पुढे ढकलून २२ ऑगस्ट तारीख देण्यात आली. या अनुषंगाने काल सोमवार, २२ रोजी याची सुनावणी होणार असल्याचे मानले जात होते. तथापि, सुनावणी ही पुन्हा एकदा पुढे गेली असून यावर मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

प्रकरण घटनापिठाकडे वर्ग
सर्वोच्च न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठापैकी न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार सोमवारी अनुपस्थित असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर आज या याचिकांवर आज सुनावणी सुरू करण्यात आली. सरन्यायाधिश रामण्णा, हीमा कोहली आणि कृष्ण मुरारी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यात घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.


कॉपी करू नका.