Ncp Leader Anil Deshmukh Admitted In Jj Hospital After He Falls In Arthur Road Jail ऑर्थर रोड तुरूंगात माजी गृहमंत्री अनिल देशमुख चक्कर येवून पडले


Ncp Leader Anil Deshmukh Admitted In Jj Hospital After He Falls In Arthur Road Jail मुंबई : ऑर्थर रोड तुरुंगात चक्कर येऊन पडल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे जखमी झाले असून त्यांना तत्काळ मुंबईतल्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली.

चक्कर येवून पडले देशमुख
मनी लाँण्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली असताना शुक्रवारी सकाळी 11 वाजता ऑर्थर रोड कारागृहात देशमुख चक्कर येवून पडले. त्याचवेळी प्रशासनाने त्यांना जेजे रुग्णालयात हलवले. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली गेल्या दहा महिन्यांपासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत.



यापूर्वी झाली खांद्यावर शस्त्रक्रिया
अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रियेसाठी त्यांना एप्रिल महिन्यात जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशमुख यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या निखळलेल्या खांद्यावरील उपचाराबाबत अनिल देशमुखांनी खासगी रुग्णालयात उपाचाराची मागणी केली होती. मात्र, ईडीच्या विरोधानंतर त्यावर निर्णय देत विशेष पीएमएलए न्यायालयाने विनंती फेटाळली होती. त्यानंतर त्यांच्यावर जेजे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !