There will be a discussion: Thackeray and Shinde groups came together in Jalgaon शिंदे-ठाकरे गट एकत्र आल्यानंतर गुलाबराव स्पष्टच म्हणाले ; एकमेकाला गोळ्या मारल्या नाहीत ; मी संबंध जपणारा माणूस


There will be a discussion: Thackeray and Shinde groups came together in Jalgaon जळगाव :  राज्यातील शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नाराज शिंदे गट समर्थकांनी भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सरकार आणल्यानंतर संबंध कमालीचे ताणले गेले मात्र जळगावात दोन्ही गटाचे समर्थक एकत्र आल्यानंतर चर्चा होणार नाही तर नवलच! जळगावीतल एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आले होते. त्यांच्यासोबत त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबत निष्ठेने राहिलेले गुलाबराव वाघही दिसून आले.

उपस्थितांच्या उंचावल्या भुवया
राज्यात ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद असलेतरी जळगावात मात्र या दोन्ही गटाचे नेते एकत्र आले होते याचं निमित्तही खास होते. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथं श्रीजी जिनिंगमध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला. या कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.



दोन्ही गटातील नेत्यांसह समर्थकांची उपस्थिती
धरणगावातली श्रीजी जिनिंग ही शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मालकीची आहे. शिवसेनेत फूट पडली तरी ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. आता त्यांच्या जिनिंगमध्ये कार्यक्रम असल्यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे त्याठिकाणी येतील का? याबाबत शंका होती, पण गुलाबराव पाटील आले. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे इतर कार्यकर्ते पण आले. दुसरीकडे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि त्यांचे कार्यकर्तेही त्याठिकाणी उपस्थित होते.

गुलाबराव स्पष्टच म्हणाले ः मी संबंध जपणारा माणूस
गुलाबराव पाटील म्हणाले की, राजकारणात हे चालत असतं. आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे वेगवेगळे आहेत. मग ते काय एकमेकांच्या सुख-दुःखात जात नाहीत का? राजकारणाच्या आखाड्यात जो तो ज्याची त्याची कुस्ती लढेल. पण व्यक्तिगत संबंध खराब करणारा मी माणूस नाही आणि आम्ही काय एकमेकांना गोळ्या मारलेल्या नाहीयेत असे स्पष्टीकरण मंत्री पाटलांनी दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !