माणुसकी जिवंत : एक लाखांची रोकड असलेली बॅग केली परत


Humanity Alive: A bag containing one lakh cash is returned मुक्ताईनगर : 90 हजारांची रोकड व दोन मोबाईल असलेली बॅग परत करून श्रीकृष्ण जुमळे (सुळे) यांनी प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. शिक्षकासह महिलेने सुळे गाव गाठून जुमळे यांची भेट घेत त्यांचे मनापासून आभार मानले.

रस्त्यावर पडली बॅग
पिंपळगाव येथील प्रियंका गजानन जुमळे यांची 90 हजारांची रोकड व दोन मोबाईल असलेली बॅग पिंपळगाव रस्त्यावर दुचाकीवरून पडली तर ही बॅग सुळे येथील श्रीकृष्ण जुमळे यांना रस्त्यावर बेवारसरीत्या पडलेली दिसल्याने त्यांनी ती उचलून घरी आणली. काही वेळानंतर बॅगेतील फोन खणखणल्याने जुमळे यांनी तो उचलल्यानंतर समोरील व्यक्तीने आपण शिक्षक असल्याचा परीचय दिला व बॅग रस्त्यात गहाळ झाल्याची माहिती दिली. त्यानंतर शिक्षकासह प्रियंका जुमळे यांनी श्रीकृष्ण जुमळे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना 90 हजारांच्या रोकडसह दोन मोबाईल असलेली बॅग गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत परत करण्यात आली. जुमळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल ग्रामस्थांसह पोलिस प्रशासनाने त्यांचे कौतुक करीत सत्कारही केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !