गणपती मंडप उभारण्याच्या वादातून महिलेवर हात उचलणार्‍या कार्यकर्त्याची मनसेतून हकालपट्टी


Expulsion of MNS activist who raised hand on woman in dispute over construction of Ganapati Mandap
मुंबई :
  मनसे कार्यकर्त्याने महिलेले केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयातून व्हायरल झाल्यानंतर मनसेवर टिकेची झोड उठली होती मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेकडून त्या पदाधिकार्‍याची हकालपट्टी करण्यात आली. शहरातील कामाठीपूरा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन झालेल्या वादात एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर मनसेच्या कार्यकर्त्याने हात उचलल्याची घटना घडली होती.

ज्येष्ठाचा सन्मान ही तर मनसेची भूमिका
कामाठीपूरा या परीसरात घडलेली घटना पाहून मनः विषन्न झाले. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुध्दा दिला असतांना सदर घडलेल्या घटने बाबत पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणुन कामाठीपूरा विभागातील उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरून पदमुक्त करण्यात येत आहे. भविष्यात या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती घेवून व सखोल चौकशी करून यांग्य तो निर्णय घेण्यात येईल. महिलांचा व जेष्ठांचा आदर सन्मान हा राखला गेलाच पाहिजे, असे पत्र ट्विटरवर पोस्ट करत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

खांब उभारण्यावरून झाला होता वाद
मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद गणपतीच्या मंडपाचा खांब उभारण्यावरुन वाद झाला. यावेळी एका व्यक्तीने सर्वांसमोर महिलेला मारहाण केली. विनोद अरगिले असे मारहाण करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. तो मनसेचा विभाग प्रमुख असून, पोलिसांनी त्याच्यासह राजू अरगिले, सतीश लाढ यांना ताब्यात घेतले आहे. या परिसरात मनसेचे कार्यकर्ते मंडपाचा खांब उभारत होते. यावेळी प्रकाश देवी नावाच्या महिलेने त्यांना तिच्या औषध दुकानासमोर खांब न लावण्यास सांगितले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली. 80 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये महिलेला मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी एकही स्थानिक हस्तक्षेप करत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या पदाधिकार्‍यावर मनसे काय कारवाई करते, याकडे सार्‍यांचेच लक्ष होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !