Hanuman Chalisa will be recited by the Rana couple in Jalgaon on 5th जळगावात 5 रोजी राणा दाम्पत्याकडून हनुमान चालिसाचे होणार पठण


Hanuman Chalisa will be recited by the Rana couple in Jalgaon on 5th जळगाव : खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे 5 रोजी जळगाव येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. भाजपा नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे यांच्या गणेशोत्सव मंडळाला राणा दाम्पत्य सोमवारी भेट देतील व यावेळी त्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण केली जाणार आहे.

प्रथमच राणा दाम्पत्य येणार जिल्ह्यात
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा प्रथमच खान्देशातील जळगावात येत असल्याची माहिती युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अक्षय शिंदे, सोशल मीडिया प्रसिध्दी प्रमुख दीपांशु लोणे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !