भुसावळातील शिक्षकांचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड ’ ने सन्मान

उल्लेखनीय कार्याची दखल : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा उपक्रम


भुसावळ : विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असतात. या विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करणारे शिक्षकवृंद खर्‍या अर्थाने राष्ट्र निर्माणासाठी हातभार लावत असतात. या शिक्षकांचे कौतुक व्हावे तसेच त्यांचा हुरूप वाढण्यासाठी दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या निवडक शिक्षकांना रोटरीतर्फे राष्ट्रस्तरीय नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येते. रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शहर आणि परीसरातील 16 शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रभाकर हॉलमध्ये झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख सोनू मांडे यांनी केले.डॉ.चांदवडकर म्हणाले की, आतापर्यंत देशभरातील फक्त 500 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. यात भुसावळ आणि परीसरातील 16 शिक्षक आहेत ही गौरवास्पद बाब आहे. या सन्मानाने नव्या उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळाली, असे भावोद्गार सत्कारार्थी शिक्षकांनी काढले. रोटरी रेलसिटीचे सचिव सन्मित पोतदार यांनी आभार मानले. सोहळ्यास रोटरी रेलसिटीचे सदस्य तसेच सत्कारार्थी शिक्षक सहपरीवार उपस्थित होते.

यांचा झाला पुरस्काराने गौश्रव
नेशन बिल्डर अवॉर्ड मिळवणार्‍या शिक्षकांमध्ये अहिल्यादेवी शाळेचे नाना पाटील, डी.एस.हायस्कूल भुसावळच्या सीमा भारंबे, जिजामाता विद्यामंदिराचे प्रसन्न बोरोले, गाडगेबाबा विद्यालयाचे दीपक आमोदकर, बी.झेड उर्दू शाळेच्या शेख हुमेरा, आमोदा विद्यालयाचे संजीव बोथे, आदर्श हायस्कूल भुसावळचे विजय मंगलानी, जि.प.शाळा सांगवी खुर्द, ता.यावलच्या जयश्री काळवीट, प.के.कोटेचा शाळेचे अनिल कोष्टी, तु.स.झोपे विद्यालयाच्या संध्या भोळे, जि.प.शाळा जोगलखोरीचे दीपक पाटील, जि.प.शाळा वाघळुदचे अमित पाटील, प्रतिभा पाटील विद्यालय कंडारीचे महादेव देव सरकटे, जि.प.शाळा मोंढाळा शाळेच्या संगीता सूर्यवंशी, भुसावळ हायस्कूलचे मनीष गुरचळ आणि ताप्ती पब्लिक स्कूलच्या रचना महाजन यांचा समावेश आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !