भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांची भुसावळात नितीन धांडे यांच्याकडे सांत्वनपर भेट


भुसावळ : भुसावळातील प्रसिद्ध अष्टभुजा डेअरीचे संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे यांचे वडील व माजी नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांचे सासरे कै.बाबूराव धांडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाल्याने धांडे परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. यानिमित्त धांडे कुटुंबियांकडे द्वारदर्शनासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजु मामा भोळे यांनी नुकतीच भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदारांनी नितीन धांडे यांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला तसेच दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थनाही केली. यावेळी आँऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वाणी, संतोष बारसे, भानुदास पाटील, प्रदीप वराडे, प्रकाश धांडे, मनीष पाचपांडे, अजय येवले, ललित भंगाळे, शुभम धांडे व धांडे परीवारातील सदस्य उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !