आदिवासी टोकरे कोळी समाजावे जात प्रमाणपत्राबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन
मुक्ताईनगर : आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या पदाधिकार्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना जात प्रमाणपत्र तसेच इतर अनेक समस्यांबाबत निवेदन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन
रावेर लोकसभा क्षेत्रातील आदिवासी टोकरे कोळी जमात पदाधिकार्यांनी दोन दिवसा आधी खासदार खडसे यांची कोथळी (मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना कोळी समाज बांधवांना शैक्षणिक व शासकीय कामकाजात येणार्या जात प्रमाणपत्राच्या अनेक समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्याअनुषंगाने खासदार खडसे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनांत अपर जिल्हाधिकारी तसेच अमळनेर, भुसावळ व फैजपूरचे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्यासह आदिवासी टोकरे कोळी जमात पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.

यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी तसेच अमळनेर, भुसावळ व फैजपूरचे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्यासह अशोक कांडेलकर, पुरुषोत्तम कोळी, हरलाल कोळी, चंद्रकांत भोलाणे, शांताराम सपकाळे, रंगराव देवराज, विनायक कोळी, आत्माराम कोळी, ईश्वर कोळी, पंकज कोळी, गुणवंत पिवटे, छगन देवराज, गोपाळ कोळी, संदीप शिरसाळे, अशोक शिरसाळे, भिका सोनवणे, संजय सपकाळे, सागर कोळी, गोपाल देवराज आदी उपस्थित होते.
