डॉ.नि.तु.पाटील विद्यापीठात प्रथम
भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या पदवीत्तर डिप्लोमा इन मेडिकल जुरीस्प्रुडन्स आणि टॉक्सिकॉलॉजी या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ.नितु पाटील यांनी विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
यशानंतर अभिनंदनाचा वर्षाव
जळगाव येथील खान्देश कॉलेज शिक्षण सोसायटी संचलित एस. एस. मणियार विधी कॉलेज मधुन त्यांनी पदवीत्तर डिप्लोमा इन मेडिकल जुरीस्प्रुडन्स आणि टॉक्सिकॉलॉजी या विषयासाठी भरती झाले. यावेळी त्यांना प्रा.डॉ.विजेता सिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याआधी देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीत्तर डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयात ते विद्यापीठात प्रथम आले होते. डॉ. नितु पाटील यांनी मिळवल्यानंतर यशानंतर खान्देश कॉलेज सोसायटी अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, विधी कॉलेज अधिष्ठाता डॉ.बी.युवाकुमार रेड्डी आणि सर्व कॉलेज स्टाफने अभिनंदन केले आहे.

