Blaze in ward number eight in Bhusawal भुसावळातील प्रभाग क्रमांक आठमध्ये झगमगाट
माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या तत्परतेने समस्या सुटली
Former corporator Deepak Dhande promptly solved the problem भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील हद्दीबाहेरील भागामध्ये मागेल त्याला ‘एल ईडी लाईट’ माजी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांच्यावतीने दिले जात आहेत. प्रभाग क्रमांक आठमधील वरदविनायक कॉलनी, महालक्षमी नगर, स्वामी विहार, नारायण नगर, व इतर वाढीव भागामध्ये काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक पोल वरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने वयोवृद्धांचे हाल होते तर काही पोलवर स्ट्रीट लाईटचा अभाव होता त्यामुळे या भागात अंधाराचे साम्राज्य होते
नागरीकांनी व्यक्त केले समाधान
नागरीकांची अडचणी लक्षात घेता या भागातील माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी या भागात 40 ठिकाणी नवीन एलईडी लाईट लावल्याने नागरीकांनी धांडे यांचे आभार मानले आहेत. दिवाळीपर्यंत शंभर स्ट्रीट लाईट लावण्याचा संकल्प दीपक धांडे यांनी केला आहे.

