लोकशाही बळकटीकरणासाठी आधारकार्डशी मतदान ओळखपत्र जोडणी करा : धीरज पाटील


भुसावळ : मतदार याद्या अधिकाधिक त्रृटीरहित करण्यासाठी आता मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याची मोहिम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. जळगाव रोड परीसरातील नागरीकांच्या सोयीसाठी परीसरातील शिवसेनेचे तालुका संघटक, सामाजिक कार्यकर्ते प्रा.धीरज गणेश पाटील यांनी गणेशोत्सव 2022 निमित्त निवडणूक आयोग मतदान कार्ड आधारकार्ड लिंक शिबिराचे आयोजन केले आहे

तीन ठिकाणी फॉर्म संकलन
परीसरात तीन हजार परीवारांना फॉर्मचे वाटप करण्यात आले असून एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे दोन ते नवीन वेगवेगळ्या याद्यांमध्ये समाविष्ट असतात, त्यामुळे बीएलओना सुद्धा ओळख पटवणे कठीण होते. यासाठी उपाय म्हणून एकाच फॉर्मवर पूर्ण कुटुंबाची संयुक्त माहिती भरून घेतली जात आहे. नागरीकांना या फॉर्म वर कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार कार्ड, मतदान कार्ड क्रमांक आणि मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देणे आहे. रींग रोडवरील चितोडे वाणी समाज मंगल कार्यालयासमोरील श्री मोरया क्रिएशन, भिरूड कॉलनी येथील आशीर्वाद झेरॉक्स, तसेच विद्यानगर येथील सुजीवन प्रोव्हिजन येथे दिनांक 10 सप्टेंबर 2022 पर्यंत फॉर्म संकलित केले जाणार आहे. आधारकार्ड हे मतदान ओळखपत्राशी जोडणे हे महत्त्वाचे झाले आहे.

या प्रणालीमुळे आधारकार्ड मतदार कार्डशी लिंक करणे सोपे होणार आहे. शिवाय नागरीीकांचा आणि बीएलओचा वेळ वाचणार आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी नागरीकांनी याबाबत पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !