Shiv Sainik Shinde faction of Thackeray faction in Warangaon city वरणगाव शहरातील ठाकरे गटातील शिवसैनिक शिंदे गटात
20 रोजी मुख्यमंत्री शिंदे यांचे बसस्थानक चौकात करणार जंगी स्वागत
वरणगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मुक्ताईनगर दौर्यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांचे मंगळवार, 20 रोजी त्यासाठी जंगी स्वागताचेही नियोजन करण्यात आले आहे. राज्यात शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य शैलीवर नाराज होत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा दुसरा गट स्थापन केला आहे.
हिप्पीसेठ यांचा पदाचा राजीनामा
शिंदे गटात जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकार्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटातील शिवसेना तालुका समन्वयक जाफर अली मकसुद अली (हिप्पी सेठ) यांनीही नाराजी दर्शवित आपल्या पदाचा 11 सप्टेंबर रोजी राजीनामा देत असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वरणगावातही ठाकरे गटाला हादरा बसला आहे.

मुख्यमंत्र्यांचे होणार जंगी स्वागत
शिवसेनेच्या ठाकरे गटावर नाराजी व्यक्त करीत जाफरअली मकसुदअली (हिप्पी सेठ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख समाधान महाजन, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलासजी पारकर, भुसावळ तालुका संपर्क प्रमुख सुरेश राणे यांच्याकडे सोपवला आहे. शिंदे गटातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश तसेच वरणगाव बसस्थानक चौकात जंगी स्वागताची तयारी सुरू केली आहे.
