MLA Chandrakant Patil मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा : दिवसभर कार्यकर्त्यांची रीघ
Wishes showered on Muktainagar MLA Chandrakant Patil मुक्ताईनगर : विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांसह नेत्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली. सकाळच्या सात वाजेपासून कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर शहरात गर्दी केली होती. आमदार निवासस्थानापासून रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे अक्षरशः वाहतुकीची कोंडी सायंकाळी उशिरापर्यंत कायम होती.
यांची होती उपस्थिती
आमदार चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देणार्या प्रमुख नेत्यांमध्ये जिल्हा परीषद सदस्य तथा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपूत्र प्रतापराव पाटील, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष व प्रदेश भाजपा उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, माफदाचे राज्याध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा परीषदेचे माजी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, पद्माकर महाजन, मुक्ताईनगर भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख ललित महाजन या प्रमुख नेत्यांसह जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्ये उपस्थित होते. मुक्ताईनगर तालुका सोसायटीचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक, शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी दिवसभर आमदार पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

