पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या बडतर्फीसाठी रावेरात मराठा समाजाचे अर्धनग्न आंदोलन
Half-naked protest of Maratha community in Ravera for dismissal of Police Inspector Kiran Kumar Bakale रावेर : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य करणार्या जळगावातील पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी रावेर तालुका मराठा समाजातर्फे रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
आक्षेपार्ह ऑडियो क्लीप व्हायरल
जळगाव गुन्हे शाखेच्या एका कर्मचार्याशी बोलताना गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची जीभ घसरली. त्यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे. वाढत्या तक्रारीनंतर बकाले यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे मात्र निलंबनाइतकी कारवाई न करता बकाले यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी रावेर तालुका मराठा समाजातर्फे करण्यात आली. बकाले यांना बडतर्फे न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला.

मराठा समाजातर्फे यांनी दिले निवेदन
यावेळी ‘प्रहार जनशक्ती’चे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील अर्धनग्न होऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, घन:शाम पाटील, सोपान पाटील, विनोद चौधरी, प्रशांत पाटील, सुनील महाजन आदी मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
