बेताल वक्तव्याचा निषेध : निरीक्षक बकालेंना बडतर्फ न केल्यास मुक्ताईनगरात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मुक्ताईनगर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरडे व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुक्ताईनगरातील शिवसैनिकांनी निषेध केला आहे. बकाले जेथे जातील तेथे त्यांच्या मनात मराठा समाजाबद्दल द्वेष कायम राहणार असल्याने अशा अधिकार्याला सेवेतून बडतर्फ करावे तसेच बकाले यांना समर्थन देणार्या अशोक महाजन यांच्याविरोधातही सामाजिक भावना दुखाविल्याबाबत व महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियम, अटी व शर्तीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेना पदाधिकार्यांनी तहसीलदार व निरीक्षक यांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देवून केली. मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना आमदार चंद्रकांत पाटील, मराठा समाज तालुकाध्यक्ष अनंतराव देशमुख, दिनेश कदम, संदीप बागुल, नरेंद्र गावंडे, दिलीप पाटील (चोपडे), प्रफुल्ल पाटील, गणेश पाटील, ललित बाविस्कर, अविनाश बोरसे, साहेबराव पाटील, रमेश पाटील, किशोर पाटील, शिवाजी मराठे, गणेश पाटील, किरण महाजन, नगरसेवक संतोष मराठे, रवींद्र चव्हाण, राहुल शेळके, प्रदीप दांडगे, नीरज पाटील, जितेंद्र पाटील, चंद्रकांत मराठे, निलेश पाटील, रोशन थोरात, दीपक कांदेले, सोपान मराठे, सचिन पाटील आदींसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेतर्फे निवेदन देताना आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, सुनील पाटील, अफसर खान, राजेंद्र तळेले, नगरसेवक मुकेश वानखेडे, आरीफ आझाद, युनूस खान, बबलू कोळी, पियूष मोरे, वसंत भलभले, संतोष मराठे, राजेंद्र हिवराळे, निलेश शिरसाट, संदीप पाटील आदींसह असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

