आदर्श ग्राम विकास योजनेच्या आराखड्यासाठी खासदारांच्या सूचना

रावेर लोकसभा क्षेत्रातील 70 आदिवासी गावांचा समावेश


मुक्ताईनगर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या विचारधारेवर अनुसूचित जमातीच्या जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्राम विकास योजनेचा आराखडा सुरू करण्याबाबत खासदार रक्षा खडसेंंनी सूचना केल्या. एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या यावल प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी खासदार रक्षा खडसेंची भेट घेऊन त्यांच्याकडून या योजना चांगल्या रीतीने राबविण्यासाठी मार्गदर्शन व सुचना जाणून घेतल्या.

आदिवासींचे उंचावणार जीवनमान
प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत अनुसूि1चत जमातीची जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातून राहत असलेली कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने या गावांमध्ये उत्कृष्ट शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा, दळणवळण सुविधा, पायाभूत सुविधा व उपजीविका ई. क्षेत्रात सुधारणा करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे सदर आदिवासी नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे यावेळी खासदार खडसे यांनी सांगितले. दरम्यान, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळजवळ 90 ते रावेर लोकसभा क्षेत्रातील 70 गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी शासकीय वसतिगृह व आश्रमशाळा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन आदिवासी नागरीकांशी संवाद साधून गावाच्या गरजा, क्षमता आणि आकांक्षा लक्षात घेऊन शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्वेक्षण करतील, असे यावेळी खासदार खडसे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !