आरटीओ अधिकारी श्याम लोहींसह निरीक्षक बकालेंची वाढली अडचण : मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश


RTO Officer Shyam Lohi and Inspector Bakal increased difficulty : Chief Minister gave ‘this’ order चाळीसगाव : मराठा समाजाविषयी वादग्रस्त वकतव्य करणारे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करण्यासह वाहन धारकांकडून हप्ता वसुली करणार्‍या जळगाव उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें यांची भेट घेत पत्राद्वारे केली.

चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश
दरम्यान, तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी निलंबित पोलिस निरीक्षक बकाले यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालकांना दिले राज्याचे परीहन आयुक्त अविनाश ढाकणे, जळगावचे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही तसेच त्यांना अभय देणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालकांना दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडे आरटीओ अधिकार्‍यांना यांना हफ्ता देणार्‍या 100 ट्रक व वाहन चालकांची यादीच आमदारांनी यावेळी सादर केली.

भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात आपली लढाई
आपली लढाई ही कुठल्या व्यक्ती अथवा जाती विरोधात नसून अन्यायी, भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रवृत्तीविरोधात असल्याचे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. या प्रवृत्तीमुळे गोर-गरीब, वंचित, पिडीत घटक यांच्यावर अन्याय होते, त्यांचे शोषण होते त्यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरु राहील, असेही आमदार म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !