रोहिणी खडसेंचा जनसंवाद यात्रेचा उपक्रम कौतुकास्पद

विरोधी पक्ष नेते अजित पवार : यात्रेच्या समारोपाला 1 डिसेंबरला येण्याची ग्वाही ः कार्यकर्त्यांना यात्रेचे आवाहन


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघातील प्रत्येक गावात वस्त्यांवर-पाड्यावर जाऊन तिथल्या नागरीकांशी संवाद साधणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहचवणे यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात 15 ऑगस्टपासून राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली असून 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वभूमीवर निघालेली ही यात्रा भारताच्या संविधान स्विकृत दिनी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असून या यात्रेचा समारोप 1 डिसेंबर रोजी होत असून या कार्यक्रमास आपण स्वतः उपस्थित राहू, अशी ग्वाही वरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

अ‍ॅड.रोहिणी खडसेंचे केले कौतुक
15 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी पवार यांना जनसंवाद यात्रेच्या आतापर्यंत झालेल्या प्रवासाचा अहवाल सादर केला. पवार यांनी जनसंवाद यात्रेची विस्तृत माहिती जाणून घेतली. दरम्यान, अजित पवार म्हणाले की, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात असणार्‍या 182 गावांमध्ये ही यात्रा जाणार असून ही यात्रा 57 गावांमध्ये आतापर्यंत पोहोचली आहे. या ठिकाणचा नागरीकांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. या यात्रेदरम्यान रोहिणी खडसे आणि पक्षाचे पदाधिकारी मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत जात आहेत, नागरीकांच्या समस्या जाणून घेत आहेत, छोट्या मोठ्या समस्या तात्काळ तिथल्या तिथे मार्गी लावत असल्याने अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचा जनसंवाद यात्रेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे कौतुक पवार यांनी करीत इतर पदाधिकार्‍यांनी सुद्धा आपल्या तालुक्यात जनसंवाद यात्रा राबवावी, असे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी आमदार एकनाथराव खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, संतोष चौधरी, साहेबराव पाटील, जगदीश वळवी, जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !