पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रम
पोषण आहार सप्ताहात विविध स्पर्धा : सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन
भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शासनाच्या पोषण माह अंतर्गत एकात्मिक बाल कल्याण विभागाच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोषण आहार सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच सुदृढ बालक स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदारांनी कुपोषण मुक्तीची प्रतिज्ञा दिली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडर्सेें आमदार संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, डॉ.मृणाल पाटील, परीक्षक जयश्री चौधरी, अनिता आंबेकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका गायकवाड, भाजप शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे उपस्थित होते.

विविध स्पर्धांचे आयोजन
पोषण आहाराचे महत्व पटवून देणार्या अंगणवाडी सेविकांसाठी पोषण आहार, पाक कला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील सात बीटपैकी प्रत्येक बीटमध्ये सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. ज्यात 6 महिने ते 3 वर्ष व 3 वर्ष ते 6 वर्ष असे दोन गट ठेवण्यात आले. पाककला स्पर्धामध्ये सेविकांनी उत्कृष्ठ सादरीकरण करून आमदारांचे व उपस्थितांचे लक्ष्य वेधले. सेविकांनी शेवग्याच्या पानांचे पराठे, बिटचे लाडू, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून पराठे,लुप्त होत चाललेल्या रान भाज्या , गंगाफलाचा शिरा, वेगवेगळ्या प्रकारची पौष्टिक खीर, कडधान्य पासून तयार केलेले खाद्य पदार्थ, विविध आंबवलेले पदार्थ असे उत्कृष्ट ,चविष्ट व पौष्टिक खाद्यपदार्थ सादर केले. डॉ.मृणाल पाटील यांनी किशोरवयीन मुलींना व सेविकांना पोषण आहार व शारीरिक स्वच्छतेवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रजनी सावकारे यांनी केले.
यांनी घेतले परीश्रम
मनीषा काकडे, वैशाली भदाणे, पूजा पाटील यांनी तथा अंगणवाडी पर्यवेक्षिका गायकवाड, जोशी, जाधव, रोझतकर, बोरीकर, प्रवीण पाटील व उबाळे यांनी परीश्रम घेतले.
