इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी अध्यक्षपदी प्रतीक्षा पाटील
भुसावळात पदग्रहण सोहळा उत्साहात ः सचिवपदी मीनाक्षी धांडे
Innerwheel Club of Bhusawal Railcity Prakishta Patil as President भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण सोहळा प्रभाकर हॉलमध्ये झाला. यावेळी अध्यक्षपदाची सूत्रे पूर्व अध्यक्ष मोना भंगाळे यांच्याकडून प्रतीक्षा पाटील यांनी तर सचिव पदाची सूत्रे मीनाक्षी धांडे यांनी स्वीकारली.
या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे, डॉ.रश्मी शर्मा, रजनी सावकारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने क्लब सर्व सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष प्रतीक्षा पाटील म्हणाल्या की, समाजोपयोगी कार्यक्रम व महिलांसाठी आणि पर्यावरण उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येतील. प्रमुख पाहुणे इतर सर्व सदस्यांचे तुळशी रोप देऊन स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रसंगी डॉ.मृणाल पाटील, किरण पोलडिया, डॉ.किर्ती चांदवडकर, आदिती भडंग, आरती पाटील, मोना भंगाळे, सीमा सोनार, सुनीता पाचपांडे, कविता पाचपांडे, पल्लवी वारके, विनीता नेवे, मीनाक्षी धांडे, नीता अहिरराव, कोमल पाटील, स्नेहांकिता जाधव, जागृती पाटील,रेवती मांडे, संगीता पाटील, कांचन चौधरी, काजल पाटील उपस्थित होत्या.
