Chalisgaon youth attempted self-immolation in front of the collector’s office धक्कादायक ! : रुग्णवाहिकेने शासनाने थकवले भाडे : चाळीसगावच्या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला आत्मदहनाचा प्रयत्न


Chalisgaon youth attempted self-immolation in front of the collector’s office जळगाव : रुग्णवाहिकेचे तब्बल 15 लाख 51 हजार 400 भाडे थकल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अ‍ॅम्ब्युलन्स मालक धीरज अशोक कासोदे (चाळीसगाव) याने शुक्रवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली तर पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. कोविड काळात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव, महात्मा फुले आरोग्य संकुल येथे कासोदे यांनी रुग्णवाहिका चालवली होती.

शासनाकडे थकले 15 लाखांचे भाडे
कासोदे याच्या मालकीच्या तीन अ‍ॅम्ब्युलन्स कोविड 19 च्या वेळेस 21 ऑक्टोबर 2020 ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात शासकीय सेवेत होत्या. मात्र, या अ‍ॅम्ब्युलन्सचे 15 लाख 51 हजार 400 रुपयांचे भाडे शासनाकडे अद्यापही थकीत आहे. हे पैसे शासनाकडून अद्यापही धीरज कासोदे याला मिळालेले नाहीत. त्यामुळे थकीत वेतन न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता.

पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्राण
त्यानुसार त्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याने अंगावर डिझेल ओतून घेतले. त्याला तातडीने जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याचा जीव वाचविला.

 


कॉपी करू नका.