Malegaon city police station inspector along with three in ACB’s net मालेगाव शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात


Malegaon city police station inspector along with three in ACB’s net मालेगाव : मालेगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार ताराचंद घुसर (रा. शिवपार्वती अपार्टमेंट, सोयगाव), पोलीस नाईक आत्माराम कशिनाथ पाटील (रा. कोचीवाडा कॉनर, कॅम्परोड, मालेगाव) आणि सय्यद रशीद सय्यद रफीक उर्फ राशीद बाटा (मालेगाव) यांना 20 हजारांची लाच घेताना नाशिक एसीबीने अटक केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नशेच्या पदार्थाशी संबंधित असलेल्या व्यक्तीसह त्याच्या मित्रावर कारवाई न करण्यासाठी संशयीतांनी लाच मागितली हेाती.

20 हजारांची लाच भोवली
30 तक्रारदाराचा भाऊ व त्याचे दोन मित्र 3 सप्टेंबर 2022 रोजी जेवण करून घरी परतत असताना ते एमडी या नशेच्या पदार्थाशी संबंधित आहेत, या कारणा वरून त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराचा भाऊ व त्याचे दोन मित्र यांच्यासाठी सुरुवातीला एक लाख रुपये व नंतर तक्रार दाराचा भाऊ व त्याचा एक मित्र यांच्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अखेर तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली.
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार एकनाथ बाविस्कर, मनोज पाटील, संजय ठाकरे, नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
निरीक्षक संदीप घुगे, सहायक अधिकारी गायत्री जाधव यांच्यासह पथकाने ही
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कारवाई केली.


कॉपी करू नका.