12th student stabbed in broad daylight in Bhusawal भुसावळात भरदिवसा बारावीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला


12th student stabbed in broad daylight in Bhusawal भुसावळ : बारावीच्या विद्यार्थ्यावर भर दिवसा चाकूहल्ला झाल्याची घटना शहरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर संशयीत पसार झाले असून बाजारपेठ पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला. संशयीतांच्या हल्ल्यात आदित्य कैलास सावकारे (१८) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हल्ल्याची घटना घडली.

भर दिवसा केला चाकूहल्ला
शहरातील नाहाटा महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेणार्‍या आदित्य कैलास सावकारे (१८) याच्यावर विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या पूर्वीच्या वादातून महाविद्यालयातीलच दोन विद्यार्थ्यांनी हिमालया पेट्रोल पंपांसमोर चाकूने हल्ला चढवला. चाकू हल्ल्याची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, प्रशांत परदेशी, निलेश चौधरी, तुषार पाटील, मिलिंद कंक, अतुल कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला ड्रामा केअर सेंटर मध्ये उपचारार्थ हलवण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !