भुसावळ तालुका फुटबॉल स्पर्धा उत्साहात
भुसावळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती भुसावळ, उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, क्रीडा समिती भुसावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुका १४ वर्षाखालील १७ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या शालेय फुटबॉल स्पर्धा नुकत्याच झाल्या.
यांची स्पर्धेप्रसंगी उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या प्राचार्य अनघा पाटील यांनी केले. स्पर्धेप्रसंगी क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे व उपप्राचार्य रमण भोळे, तालुका समन्वयक बी.एन. पाटील, महात्मा गांधीच्या व उपप्राचार्य रूपा कुलकर्णी, ईबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष, आर.आर.धनगर, सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू उपस्थित होते. १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील तिन्ही गटांच्या मुला-मुलींच्या स्पर्धा झाल्या. तालुक्यातून मुलांचे १९ तर मुलींचे आठ संघ असे एकूण ३०४ मुले १२८ मुलींनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.


असे आहेत स्पर्धेतील विजेते
स्पर्धेचा निकाल असा- १४ वर्षे वयोगट मुली- बियाणी पब्लिक स्कुल-(विजयी), डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम (उपविजयी), सेंट अलॉयसेस हायस्कूल भुसावळ (विजयी), डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल (उपविजयी), १७ वर्षे वयोगटात मुलींमध्ये बियाणी पब्लिक स्कूल (विजयी), ताप्ती पब्लिक स्कूल (उपविजयी), १७ वर्ष मुलांमध्ये बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ (विजयी), डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल (उपविजयी) तसेच १९ वर्षे वयोगटात मुलींमध्ये पु.ओ. कॉलेज भुसावळ (विजयी), बियाणी पब्लिक स्कूल (उपविजयी), मुलांमध्ये पु.ओ.नाहाटा महाविद्यालय (विजयी) तर बियाणी ज्युनिअर कॉलेज (उपविजयी). पंच म्हणून अर्जुन सणस, पंकज तिवारी, अमन शेख, काझी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विनय काळे, पराग पाटील, अश्विनी पाटील, उल्हास पाटील इंग्लिश मीडियमच्या सर्व स्टॉफने सहकार्य केले.
