मद्य चालकाकडून अनियंत्रीत झालेल्या ट्रकने 15 जणांना चिरडले : बिहार राज्यातील दुर्दैवी घटना


Drunken truck driver crushed 15 people; Events in Bihar पटना : मद्यपी चालकाकडून ट्रक अनियंत्रीत झाल्यानंतर तब्बल 15 जणांना चिरडण्यात आले असून या घटनेत जागीच आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. हे सर्व लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत असताना हा अपघात घडला. बिहारमधील वैशालीमध्ये हा प्रकार घडला आहे.

पूजा करण्यासाठी जमले होते लोक
हाजीपूर-महानर मुख्य रस्त्यावरील देसरी पोलीस स्टेशन हद्दीतील नयागाव टोलाजवळ हा अपघात झाला. नजीकच्या ब्रह्मस्थान येथे भुईं बाबाची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित ट्रकने अनेकांना चिरडले आणि नंतर ट्रक एका झाडावर आदळला. सर्व मृतांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास सुलतानपूर गावाजवळ हा अपघात झाला. गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार चालक दारूच्या नशेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.





मयत 20 वर्षाखालील
ही सर्व मुले रविवारी सायंकाळी गावातील सर्वात जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ भुईं बाबाची पूजा करण्यापूर्वी नेवतन विधीत सहभागी होण्यासाठी गेली होती. मयतांमध्ये वर्षा कुमारी (8), सुरुची (12), अनुष्का (8), शिवानी (8), खुशी (10), चन्दन(20), कोमल (10) आणि सतीश (17) आदींचा समावेश आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !