कोरोना नियमांचा भंग केल्याच्या आरोपातून जळगावचे माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता निर्दोष


Jalgaon Information Rights Activist Deepak Kumar Gupta acquitted of violating Corona rules जळगाव : कोरोनाच्या काळात 2020 मध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जमाव जमवून कोरोना नियमांचा भंग केल्याच्या आरोपातून दाखल गुन्ह्यातून गुप्ता यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी रविवारच्या पत्रकार परीषदेत दिली.

तहसील प्रशासनाने दाखल केला होता गुन्हा
2020 मध्ये दीपककुमार पी. गुप्ता यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कोविड नियमाचे उल्लंघण केल्याचा आरोप करून दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध तहसील प्रशासनाकडून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जळगावचे तत्कालीन नायब तहसीलदार हेमंत भागवत पाटील हे फिर्यादी होते. याप्रकरणी न्यायालयात कामकाज पूर्ण झाले असून, न्यायालयाने दीपक गुप्ता यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपीतर्फे अ‍ॅड.किरण शिरसाठ यांनी काम पाहिले. वाळू प्रश्नासह इतर प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरल्याने हा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुप्ता यांनी दिली तसेच या प्रकरणात पोलिस कर्मचार्‍यांवर दबाव टाकण्यात आला असू तत्कालीन तहसीलदार वैशाली हिंगे व प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांची चौकशी करण्याची मागणी गुप्ता यांनी केली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !