यावल-भुसावळ रस्त्यावर अ‍ॅपेचे टायर फुटले : चालक जखमी


App Tires Burst on Yawal Bhusawal Road : Driver Injured यावल : यावल-भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाच्या जवळ अ‍ॅपे रीक्षाचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. त्याच्यावर यावल ग्रामीण भागामध्ये उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

अपघातात चालक जखमी
यावल-भुसावळ रस्त्यावर अ‍ॅपेरीक्षाद्वारे कुणाल विठ्ठल कोळी (27, रा. भुसावळ) हा तरुण जात असताना भुसावळ-रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाजवळ अ‍ॅपेचा टायर फुटला व रीक्षा रस्त्याच्या कडेला कलंडल्याने कुणाल विठ्ठल कोळी याच्या पायाला दुखापत झाली. त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.मोहनीश शेख, अधिपरीचारीका मनिषा धांडे, विजय शिंदे आदींनी उपचार केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !