भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवले : जळगावातील एक ठार
A speeding four-wheeler blows up a two-wheeler: one killed in Jalgaon चोपडा : चोपडा ते धरणगाव रोडवर सुतगिरणीच्या अलीकडे कारने मागून धडक दिल्याने जळगावातील एक जण जागीच ठार झाला. या प्रकरणी चोपडा पोलिसात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कार चालकाविरोधात गुन्हा
गुरुवार, 17 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास चोपडा ते धरणगाव रोडवर सुतगिरणीच्या अलिकडे विशाल लिलाधर पाटील (रा. पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) आणि जितेंद्र प्रताप पाटील (रा.एकलग्न ता.धरणगाव ह.मु. जळगाव) हे दोघं जण आपल्या टीव्हीएस कंपनीची मोटर सायकल क्रंमाक (एमएच 19 डीएक्स 4651) ने जात असताना चारचाकी वाहन क्रंमाक (एमएच 19 डीव्ही 5231) वरील चालकाने मोटरसायकलला मागून जोरात धडक दिल्याने जितेंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कार चालक अपघाताची खबर न देता घटनास्थळावरुन पळून गेला. याप्रकरणी विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रदीप राजपूत हे करीत आहेत.


