प्रवाशांनो लक्ष द्या : भुसावळ-जळगाव दरम्यान तिसर्या व चौथ्या लाईन कामामुळे 38 रेल्वे गाड्या रद्द ; 18 गाड्यांचे बदलले मार्ग
प्रवासी संतप्त : भुसावळ-जळगाव दरम्यान तिसर्या व चौथ्या लाईनचे होणार काम
Attention passengers: 38 trains canceled between Bhusawal-Jalgaon due to third and fourth line work ; Changed routes of 18 trains भुसावळ : भुसावळ-जळगाव दरम्यान रेल्वेच्या तिसरी आणि चौथी लाईनीच्या नॉन इंटरलॉकिंग सिस्टीमच्या कामासाठी दोन दिवसांचा ब्लॉक जाहीर केला असून 5 आणि 6 डिसेंबर रोजी या मार्गावरून धावणार्या तब्बल 38 गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या असून 18 गाड्यांचे मार्गात बदल केले आहेत. दरम्यान, सततच्या ब्लॉकमुळे रद्द होणार्या गाड्यांमुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. गत शनिवार आणि रविवार मुंबईतील ब्लॉकमुळे 27 रेल्वे गाड्या रद्द झाल्या असताना आता पुन्हा ब्लॉक जाहीर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रद्द केलेल्या गाड्या अशा
भुसावळ-जळगाव दरम्यान होत असलेल्या कामामुळे 5 डिसेंबर रोजी नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, रेवा-राजकोट एक्स्प्रेस, नंदुरबार-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस, अमरावती-सुरत एक्स्प्रेस, अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणेद्य-जबलपूर एक्स्प्रेस, अमरावती मुंबई-एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस, भुसावळ-कटनी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.


4 डिसेंबर रोजी या गाड्या रद्द
नागपूर-पुणे एक्स्प्रेस, राजकोट-रेवा एक्स्प्रेस, सुरत.-अमरावती एक्स्प्रेस, नागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस, भुसावळ-बांद्रा एक्स्प्रेस, बांद्रा-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी 4 आणि 6 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. मडगाव-नागपूर एक्स्प्रेस, जबलपूर पुणे एक्स्प्रेस, कटनी-भुसावळ एक्स्प्रेस, तसेच 5 आणि 6 डिसेंबर रोजी सुरत-भुसावळ, भुसावळ-सुरत, देवळाली-भुसावळ शटल, भुसावळ-देवळाली शटल, भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, भुसावळ-कटनी या गाड्या रद्द करण्यात आल्या असून
कटनी-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा 4 व 6 असे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांचे बदलले मार्ग
ब्लॉकच्या काळात बिलासपूर-हापा एक्स्प्रेस ही गाडी 5 डिसेंबर रोजी बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, रतलाममार्गे तसेच हावडा-अहमदाबाद ही गाडी 4 डिसेंबर रोजी बडनेरा, भुसावळ, खंडवा, भोपाळ, रतलाम, छायापुरीमार्गे वळवण्यात आली आहे. बरोनी-अहमदाबाद ही गाडी 21 दि. 21 डिसेंबरला इटारसी, रतलाममार्गे धावणार आहे, अमृतसर-नांदेड ही गाडी 4 व 5 डिसेंबरला खंडवा, भुसावळ, अकोलामार्गे धावणार आहे. चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस ही गाडी 4 व 5 डिसेंबर रोजी बडनेरा, भुसावळ, खंडवा, भोपाळ, रतलाम मार्गे धावणार आहे. छपरा-सुरत एक्स्प्रेस ही गाडी 4 डिसेंबर रोजी इटारसी, भोपाळ, रतलाम, बडोदा मार्गे धावणार आहे. भागलपूर-सूरत ही गाडी 5 डिसेंबरला इटारसी, भोपाळमार्गे धावणार आहे. अहमदाबाद-यशवंतपूर ही गाडी 22 व 29 नोव्हेंबरला वसई, कल्याण, पुणे, दौंडमार्गे धावणार आहे. पुरी-ओखा ही गाडी 4 डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळमार्गे धावणार, बनारस, हुबळी ही गाडी 4 डिसेंबरला खंडवा, भुसावळ, बडनेरा, बल्लारशाह, सिकंदराबाद, वाडीमार्गे जाणार आहे. दानापूर-उधना एक्स्प्रेस ही गाडी 4 डिसेंबरला इटारसी, भोपाळ, रतलाममार्गे धावेल, पुरी-सूरत ही गाडी सुध्दा 4 डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, रतलाम, बडोदामार्गे धावेल, सांत्रागाची-पोरबंदर एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा 4 या दिवशी याचमार्गे धावणार आहे. पुरी-गांधीधाम ही गाडी सुध्दा याचमार्गे धावणार आहे. निजामुद्दीन-अर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ही गाडी 4 डिसेंबरला बिना, रतलाम, बडोदामार्गे धावणार आहे. यशवंतपूर अमदाबाद ही गाडी 27 नोव्हेंबर व 4 डिसेंबरला दौड, पुणे, पल्याण, वसईमार्गे धावणार आहे. रामेश्वरम-ओखा ही गाडी 25 नोव्हेंबर व 21 डिसेंबरला या दिवशी अंकाई, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसईमार्गे धावणार आहे.
