भुसावळ शहरातून दुचाकी लांबवली
Bike extended from Bhusawal City भुसावळ : शहरातील चर्चमागील नागबाबा मंदिराजवळून 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
भूषण दत्तात्रय पाटील (35, जुना सातारा, कडू प्लॉट, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, चर्चमागील नागबाबा मंदिराजवळ टीव्हीएस कंपनीची दुचाकी पार्क केली होती मात्र रविवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुचाकी लांबवली. तपास नाईक महेश चौधरी करीत आहेत.


